मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.
वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
