येत्या 12 जुलैपर्यंत नंदूरबार, धुळे, नाशिक या भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. अतिवृष्टी होणार आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर येणार आहे. राज्यात पावसाचा जोर वाढत जाणार आहे. हा पाऊस 8 जुलैपर्यंत सगळीकडेच असेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्याील निळवंडे, भंडारदरा, गंगापूरचे धरण, उत्तर महाराष्ट्रातील छोट्या धरणांत पाण्याची आवक येण्यास सुरुवात होणार आहे. छोटे – छोटे पाझर तलाव आताच्या पावसातच भरून जातील, असं पंजाबराव डख यांनी सांगितलंय.
पश्चिम महाराष्ट्रात काय होणार?
अहिल्यानगर, संगमनेर, अकोला, संभाजीनगर, जालना, अमरावती, बुलढाणा या परिसरातही आठ दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, जिल्हा, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या पट्ट्यातही 3 तीन जुलैपर्यंत पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
विदर्भात आठ दिवसात मुसळधार
मराठवाड्यातही परभणी, हिंगोली, जालना, लातूर, धाराशीव, बीड, जालना, संभाजीनगरात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. विदर्भात आठ दिवसात मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडेल. या पावसात ओढे-नाले वाहतील. येत्या 8 जुलैपर्यंतच्या काळात मुंबई, पुणे, कोकणपट्टी या भागात अतिवृष्टी होणार आहे. मुंबई, ठाणे या भागात सखल भागात पाणी साचणार असल्याचं भाकितही त्यांनी केलं आहे.
