मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. सुसंवाद साधाल.
वृषभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
कन्या : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
तूळ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
धनू : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : मन आनंदी आणि आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
