जांबुत खुर्द येथे स्मशानभूमी रस्त्याच्या मजबुतीकरणाचा शुभारंभ ; खासदार निधीतून १० लाखांची तरतूद

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत खुर्द येथील पठाण वस्ती ते डोंगरे मळा स्मशानभूमी या महत्त्वाच्या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ सरपंच सोनाली शेटे यांच्या हस्ते करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने अंत्यविधीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून ये-जा करणे कठीण होत असल्याने ग्रामस्थांकडून रस्ता दुरुस्तीची सातत्याने मागणी केली जात होती. अखेर खासदार स्थानिक विकास निधीतून या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होऊन वर्षभर सुरक्षित व सुलभ वाहतूक शक्य होणार आहे.

यावेळी उपसरपंच सुभाष डोंगरे, चेअरमन आदम पटेल, माजी सरपंच उत्तम बुरके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी पारधी, पोलिस पाटील संदिप बुरके, ग्रामपंचायत सदस्य संभाजी पारधी, माजी उपसरपंच दत्ता शेटे, पांडुरंग शेटे, गोरख डोंगरे, मुख्याध्यापक शांताराम पारधी, योगेश डोंगरे, शब्बीर पठाण, हरिभाऊ मधे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment