भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्याचं निधन 

कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एस. व्ही. रामचंद्र गौडा यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर बेंगळुरूतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी 6.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पार्थिवावर बेंगळुरूतील कामाक्षीपाल्या येथील त्यांच्या खासगी जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक त्यांना अखेरचा निरोप देणार आहेत

Leave a Comment