अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांना मोठा इशारा 

मुंबई – राज्यातील अनेक भागांत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

आज कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणीही विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

राज्यातील इतर भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली, तरी उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नागरिकांना आवाहन : विजांचा कडकडाट होत असताना उघड्या मैदानात किंवा झाडाखाली थांबणे टाळावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

Leave a Comment