नवी दिल्ली: NEET पेपर लीक प्रकरणाविरोधात आणि परीक्षा पद्धतीत सुधारणांच्या मागण्यांसाठी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती खालावली आहे.
वैद्यकीय तपासणीत त्यांना टायफॉइड झाल्याचे निष्पन्न झालं आहे. स्वतः अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ जारी करून आपल्या आजारपणाची माहिती दिली आहे
संबंधित व्हिडिओत दिपके यांनी स्पष्ट केलं की, जरी त्यांची प्रकृती बिघडली असली आणि त्यांना टायफॉइडचे निदान झालं असलं, तरी त्यांचा लढा थांबणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आणि परीक्षा प्रणालीत पारदर्शकता येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
