कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ५ जण ठार

सांगलीतील रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि राँग साईडने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत.

बोलेरो गाडीमधील एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूर हुन पंढरपूरच्या दिशेने चालले होते. यावेळी मिरज जवळील वड्डी गावाजवळ आल्यानंतर रॉंग साईडहुन विटाने भरलेला ट्रॅक्टरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.

Leave a Comment