एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार अपात्र होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सर्वात मोठा दावा

शिवसेना नाव आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली असून, यावेळी उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडत संपूर्ण घटनाक्रम मांडला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दाखल केलेल्या 2024 मधील याचिकेवर आज सुनावणी झाली.

याचिकेत, राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार शिंदेंच्या शिवसेना गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नकाराला आव्हान देण्यात आलं. यासोबतच, एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही सुनावणी झाली. सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

संजय राऊतांचा मोठा दावा

घटनेतील दहावी अनुसूची आणि परिच्छेद 2 नुसार सगळे अपात्र, बरखास्त होतील असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे. घटनेतील दहावी अनुसूची आणि परिच्छेद 2 नुसार सगळे अपात्र, बरखास्त होतील. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि मूळ शिवसेना अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवली आहे. कोणताही नियम, कायदा, कलमानुसार काम झालं नाही हे कपिल सिब्बल यांनी माडंल आहे”.

Leave a Comment