पारनेर तालुक्यात खळबळ! मनोरुग्ण महिलेचा निर्घृण खून

पारनेर तालुक्यातील कडूस गावाच्या परिसरात गुरुवारी उषा पांडुरंग शिंदे (वय ४२) या मनोरुग्ण महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा शिंदे यांचा मृतदेह कडूस गावाच्या परिसरात आढळून आला. त्यांच्या डोक्यात दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

नामदेव करंजुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी (पीएम) अहिल्यानगर येथे पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे कडूस परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment