मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
धनु : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मकर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल.
