संगमनेर – संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेची आवश्यकता आहे आणि संगमनेरमार्गे रेल्वे नेण्याची होण्यासाठी तर आपण सर्वात पुढे उभे राहून त्या मागणीला पाठिंबा देऊ, तसेच रेल्वेसाठी केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत,त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासनाच्या पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असतात. शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न झाले, त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
रहिमपूर ता संगमनेर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे म्हणाले पद, मंत्रीपद किंवा राजकीय जबाबदाऱ्या येतात-जातात, मात्र केलेले काम अनेक वर्षे लोकांच्या लक्षात राहते. त्यामुळे काम हीच आमची ओळख आहे, असे सांगत डॉ. विखे पाटील यांनी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा आणि पुण्याईचा उल्लेख केला. सर्वसामान्यांच्या आशीर्वादामुळे विखे पाटील परिवाराला समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली असून ती संधी जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वापरणे हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेरच्या रेल्वेच्या प्रश्नावरही डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेची आवश्यकता आहे आणि संगमनेरमार्गे रेल्वे नेण्याची होण्यासाठी तर आपण सर्वात पुढे उभे राहून त्या मागणीला पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच रेल्वेसाठी केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत,त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासनाच्या पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असतात. शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न झाले, त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिला.
संगमनेरचा विकास झाला पाहिजे ही भूमिका स्पष्ट करताना महायुती सरकार संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
एखादा प्रश्न नियमात बसत नाही म्हणून तो नाकारण्याची भूमिका घेता कामा नये. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने मार्ग काढणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. गरीबांच्या डोळ्यातील पाणी पुसता आले, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणता आले आणि त्यांच्या कुटुंबाला चांगले जीवन देता आले, तर त्याच कामाला खऱ्या अर्थाने लोकसेवा म्हणता येईल, अशी भूमिका डॉ. विखे पाटील यांनी मांडली.
