संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने दरवर्षी ध्वजारोहणासाठी माजी विद्यार्थ्याला आमंत्रित केले जाते. यंदा सीए ऋतुजा उत्तम धुळगंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्, राष्ट्रगीत ‘जन गण मन’, राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ध्वजगीत ‘झेंडा उंचा रहे हमारा’ यांच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक व शिस्तबद्ध परेड सादर केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पा. खेमनर यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी माजी विद्यार्थी व व्यावसायिक किसन गुळवे यांनी विद्यालयातील क्रीडा स्पर्धांसाठी जर्सी भेट दिल्या. तसेच विद्यार्थी आदिनाथ खेमनर यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. या दोघांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सांगता संगीत कवायतीने झाली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पा. खेमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष शंकरराव पा. खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, सरपंच सचिन सोनवणे, युवा नेते अनमोल खेमनर, उत्तम नामदेव धुळगंड, संगीता उत्तम धुळगंड, संतोष खेमनर, योगेश बारवे, मंगेश खैरे, करण थडानी, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर, सर्व संचालक मंडळ, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिस्तबद्ध, देशभक्तीपर आणि उत्साहपूर्ण स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
