मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृषभ : हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.
सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामे धाडसाने पार पाडाल.
कन्या : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
तुळ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहारा पार पडतील. विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मीन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
