मोठी बातमी! ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली

मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शरीरातील इन्फेक्शन (संसर्ग) आणि वाढत्या अशक्तपणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

अण्णा हजारे यांना गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. तसेच संसर्गाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर गेल्या 5 दिवसांपासून शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, वैद्यकीय उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आणि प्रकृतीत अधिक सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उच्चस्तरीय उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला.

कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत अण्णांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या बॉम्बे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून असून विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची बातमी समजताच राज्यभरातील त्यांचे समर्थक आणि नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात असून, त्यांची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. रुग्णालयाकडून लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटीन जारी केले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment