Weather Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी चढउतार होत आहे. नागरिकांना कधी पावसाच्या सरी तर कधी उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
पुण्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका जाणवत असून नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. अशातच हवामान खात्याने पुणेकरांसाठी पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे.
पुणे शहर व परिसरात आकाश दिवसभर निरभ्र राहणार असून, या काळात उन्हाचा कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. आठवडाभरापासून पुण्यासह राज्यभरातच उन्हाची तीव्रता वाढत असून, शहरातील कमाल तापमान जवळपास ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जात आहे.
बुधवारी शहरातील कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील काही दिवस शहरातीत कमाल तापमान याच दरम्यान राहील. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पुणेकरांनी दुपारी बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
