मुलीचं लग्न कसं करणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी माझ्या मुलीच्या लग्नात….

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी इंदापूरमधल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं, यामध्ये त्यांनी मुलीचं लग्न कसं करणार? याबाबतही पहिल्यांदाच भाष्य केलं.

मी माझ्या मुलीच्या लग्नात बडेजाव करणार नाही, माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी फटाके वाजवले नाहीत. फुलं नव्हती, जेवण नव्हतं, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला. मोठे लग्न प्रतिष्ठा असं काही नसतं, यात कुणी अडकू नये.

आपण कपड्यांनी मॉर्डन होतो, पण विचारांनी मॉर्डन झालं पाहिजे. मी साडी घालते, पण जिन्स घातलेल्यापेक्षा मॉर्डन आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

Leave a Comment