संगमनेरमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे रक्तदान शिबिर

‘सेवा संकल्प अभियानात’ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, अहिल्यानगर उत्तर जिल्ह्याच्या वतीने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी संगमनेर शहरातील व्यापारी असोसिएशन हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत ‘सेवा संकल्प अभियानात’ सहभाग नोंदविण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान व प्रदेश महामंत्री एजाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अल्पसंख्यांक मोर्चाचे अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांच्या नेतृत्वाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री तथा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा प्रभारी सिताराम भांगरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, भाजपा शहराध्यक्षा पायलताई ताजणे, सरचिटणीस साहेबराव वलवे आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तसेच देवळाली प्रवरा परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी झाले.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सेवा हीच संघटनेची ओळख’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

Leave a Comment