अबब! बोहल्यावर चढण्यापुर्वीच पोलिसांनी मिरवणूकीतून नवरदेवाला उचलले….

राहाता : बोहल्यावर चढण्यापूर्वी प्रेयसीच्या तक्रारीवरून नवरदेवाला लग्नापूर्वीच मिरवणुकीतून पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतल्याने वर्‍हाडी मंडळींची अचानक धांदल उडाल्याने लग्न मंडपात गोंधळ उडाला.

अवघ्या काही मिनिटात शुभमंगल सावधान होणार तोच पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला पोलीस स्टेशनला नेले. त्याचवेळी वर्‍हाडी मंडळी मंगल कार्यालयात नवरदेव येण्याची वाट बघत होते तर लग्न लावण्यासाठी गुरु येऊन थांबले होते. परंतु बोहल्यावर चढण्या ऐवजी नवरदेवाला पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली.

नाशिक येथील एका तरूणीने आमचे प्रेमसंबंध असून लग्नाचे आमिष दाखवून याने माझ्यावर अनेकदा अत्याचार केला व माझी फसवणूक केली असल्याची तक्रार राहाता पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला ताब्यात घेतले.

नाशिक येथे राहणारा व राहाता येथील नववधूशी लग्न लावण्यासाठी आलेल्या नवरदेवा विरुद्ध नाशिकच्या उच्च शिक्षित 26 वर्षीय महिलेने तक्रार दिल्यानंतर मात्र नवरदेवाचा अवतारच गळून गेला होता. तक्रारीपूर्वी कलवरे कलवर्‍या यांच्या गराड्यात असणारा नवरदेव मात्र पोलीस स्टेशनला एकटाच दिसत होता डीजे समोर नाचणार्‍या वर्‍हाडींच्या डान्सला प्रतिसाद देत घोड्यावर बसून लग्नाची स्वप्न रंगवणार्‍या त्या नवरदेवाला पोलीस स्टेशनची हवा काही वेळ खावी लागली.

शुभमंगल सावधान अर्थात अक्षदारुपी आशीर्वाद प्राप्त होण्यास अवघे काही मिनिटांचा अवधी असताना नवरदेवाच्या विरोधात नाशिक येथून आलेल्या 26 वर्षीय महिलेने राहाता पोलिसात तक्रार दिल्यानंतर नवरदेवाला पोलीसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता मंगल कार्यालयात पसरतात वर्‍हाडी मंडळींमध्ये पसरताच एकच कुजबुज चर्चा व गोंधळ उडाला.

Leave a Comment