महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
बारावीचा निकाल उद्या म्हणजेच २५ मे रोजी लागणार आहे. दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.
परीक्षेचा सीट नंबर (रोल नंबर) आणि आईचे नाव निकाल पाहण्यासाठी आवश्यक असणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल उद्या दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
खालील वेबसाईटवर निकाल पाहता येईल
http://www.mahresult.nic.in
http://www.hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल.
