समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चार भावंडाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील करमाड-शेकटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर आज (दि.२४ मे) रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अपघात (Accident) झाला.
या अपघातात संजय रजणभाई गौड (वय ४३), कृष्णा राजणभाई गौड (वय ४४), श्रीनिवास रामू गौड (वय ३८), सुरेशभाई गौड (वय ४१ रा. सर्व लेफ सिटी करडवा सुरत गुजरात) असे मृत्यू झालेल्या चार चुलत भावंडांची नावे असून ते तेलगांणा येथील काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे चारचाकी वाहनाने जात होते.
त्यावेळी करमाड-शेकटा येथील समृद्धी महामार्गावर गौड कुटुंबियांच्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असणारी चारचाकी दुभाजकावर आदळली.
यावेळी या भीषण अपघातात तिघांचा जागीच आणि एकाचा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. तर गाडीत मागे बसलेला मुलगा अपघातात बचावला आहे.
