मॉन्सूनचे आगमन कधी होणार, हवामान खात्याने दिली ‘ही’ माहिती

पुढच्या आठवडाभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात जात आहे. दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यतादेखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच मुंबई देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे.

Leave a Comment