महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सकाळी एयर अॅम्बुलन्सद्वारे त्यांचं पार्थिव आणण्यात येईल. यानंतर संध्याकाळी 5 वाजता वरोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती 28 मे रोजी अचानक बिघडली होती.
धानोरकर यांना एयर अॅम्बुलन्सद्वारे नागपूर येथून नवी दिल्लीत उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. याआधी त्यांच्यावर नागपुरात खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
2 दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना आतड्याचे इन्फेक्शन झाले. त्यावर अधिक उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने रवाना करण्यात आले होते.
