बिग ब्रेकिंग! वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर : अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील रामदास लक्ष्मण उघडे (वय-56) या शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेत एक शेळीही दगावली आहे.

याबाबत माहिती अशी की,रामदास लक्ष्मण उघडे हे आपल्या शेळ्या चारण्यास म्हाळादेवी गावच्या वाडा शिवारात गेले होते. दुपारी अचानक जोरदार वादळवाऱ्यासह पाऊस पडला.

यावेळी अचानकपणे त्याच्या अंगावर वीज कोसळली.या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिकांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेत एक शेळीही मृत्युमुखी पडली आहे.

Leave a Comment