बिग ब्रेकिंग! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद गेल्या वर्षभरापासून रिक्त होते. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी गेल्या वर्षभरापासून प्रकिया सुरू होती.

आज अखेर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

कोण आहेत डॉ. सुरेश गोसावी?

डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत.

डॉ. गोसावी यांचे प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे संशोधनाचे विषय होते.

Leave a Comment