माजी शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाई जगताप यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुंबई काँग्रेसमध्येही मोठा बदल झाला आहे.
भाई जगताप यांना काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरून हटवले असून, वर्षा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही निवड केली आहे. तसं पत्रकच त्यांनी जाहीर केलं आहे.
