Rain Alert : पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
पुढील तीन दिवस म्हणजे १२ जूनपर्यंत राज्यातील मुंबईसह कोकण, खान्देश नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
दरम्यानच्या काळात मराठवाडा विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) सकाळी गोवा ते येमेन देशाच्या आग्नेय किनारपट्टी दरम्यान सरळ रेषेत जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोल अरबी समुद्रात आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याची विशेष नुकसानदेही परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.
