BREKING! अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल….

केरळनंतर (Kerla) आज मान्सून महाराष्ट्रात (Monsoon) दाखल झाला आहे. आज ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज ही माहिती दिली आहे.

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह राज्यातील शेतकरीही चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. मान्सूच्या आगमनाची वार्ता ऐकताच सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. केरळात 8 जून रोजी मान्सून धडकला होता.

केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळ्या शक्यतांवर मात करत मान्सून आज ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनचे आज ११ जूनरोजी महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा व तामीळनाडू व आंधप्रदेशचा काही मान्सूनने व्यापला आहे.

Leave a Comment