बिग ब्रेकिंग! शरद पवार धमकी प्रकरणी मोठी कारवाई, एकाला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरून (Social Media) धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकानं रविवारी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे.

अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेनं यासंदर्भात कारवाई केली. स्थानिक न्यायालयाकडून 13 जूनपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथकं तयार करण्यात आली होती. अखेर पवारांना धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं.

दरम्यान, आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीनं हे पाऊल का उचललं याचा शोध मात्र सुरू आहेत.

Leave a Comment