साकूर येथील वसंत शेलार (सर) यांचं निधन

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत यमनाजी शेलार (सर) यांचं दुःखद निधन झाले आहे. शेलार सर यांनी वार सोमवार दि. १२ जून रोजी सकाळी ११.४५ वाजता अखेरचा श्वास घेतला.

त्यांचं ७८ वय होते. त्यांनी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी केली. तसेच साकूर येथील विरभद्र विद्यालयात शिक्षक या पदावरही काम केले आहे.

तसेच संगमनेर येथील सह्याद्री काॅलेज येथे प्राचार्य या पदावर नोकरी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे.

तसेच ते स्वर्गीय निवृत्त न्यायाधीश दिनकर शेलार यांचे बंधू होते. शेलार सर यांच्या निधनामुळे साकूरकरांवर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment