अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
या दोन्ही कार्यालयांसाठी प्रत्येकी सहा पदे निर्माण करण्यात येतील. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा असून नागरिकांना महसूलशी संबंधित सर्व कामांकरिता जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे शिर्डी येथे देखील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय घेण्यात आला.
या तालुक्यांचा समावेश
अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या तालुक्यांचा समावेश असणार आहे.
