मेष : आपला संयम ढळू देऊ नका, विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे.
वृषभ ः महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसर्यांच्या दडपणाखाली वावरू नका. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल.
मिथुन ः एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल.
कर्क ः तुमची देण्याची वृत्ती म्हणजे, अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल.
सिंह ः प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा.
कन्या ः आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे; पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.
तूळ ः तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे. म्हणून मिळणार्या सर्व संधींचे सोने करा. स्वत:साठी चांगले कपडे घ्याल.
वृश्चिक ः आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल. परंतु, कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
धनु ः वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो; पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. एकटे वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता.
मकर ः आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका; अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील.
कुंभ ः ध्यानधारणा आराम मिळवून देईल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल.
मीन ः तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे जड जाईल. मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे.
