भाजपला मोठा धक्का ; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नाशिकमधून भाजपसह (BJP) आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र ग्रामीण भागात अजूनही काँग्रेसला (Congress) मोठी मागणी असल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र शहरात काँग्रेस शहर कमिटी जम बसवण्यात व्यस्त आहेत. अशातच काँग्रेसने मोठी झेप घेत भाजपचा शिलेदार गळाला लावला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

प्रामुख्याने यात भाजपा आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील (Bhalchandra Patil) यांचा समावेश होता. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर पाटील हे काँग्रेस विचारसरणीचे असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे स्पष्टीकरण हिरे कुटुंबाकडून देण्यात आले आहे.

Leave a Comment