नगर हादरले… ‘या’ ठिकाणी एकाचा खून

अहमदनगरनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहरातील केडगाव उपनगरमध्ये अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

अंदाजे पस्तीस वर्षीय इसमाचा खून केडगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एका वीट भट्टीजवळ हा तरुणाचा मृतदेह सापडला.

ज्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

या तरुणाचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment