बिग ब्रेकिंग! राज्यातील ‘या’ निवडणुका ३० सप्टेंबरनंतर होणार…

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 30 जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता 30 सप्टेंबर नंतर होणार आहेत.

सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 42 हजार 157 संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून 6 हजार 510 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत.

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणं कठीण होतं. यासोबतच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशा संस्थांचं निवडणूक कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते. याच कारणांमुळे निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं आहे.

Leave a Comment