अहमदनगर जिल्ह्यातील ७ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

अहमदनगर – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी परिक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदलीबाबतचे आदेश नुकतेच काढले आहेत.

यामध्ये जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या सात पोलीस उपनिरीक्षकांच्या बाहेरच्या जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या असून जिल्ह्यात नव्याने सहा पोलीस उपनिरीक्षक बदलून आले आहेत.

जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे, मंगेश बेंडकोळी, भगवान शिरसाठ यांची जळगाव, अमित माळी, अमरजीत मोरे, समाधान सुरवाडे व मनोज कचरे यांची धुळे येथे बदली झाली आहे.

जिल्ह्यात सहा पोलीस उपनिरीक्षक बदलून आले आहेत. यामध्ये धुळे येथून दिनेश मोरे, नंदूरबार येथून प्रवीण पाटील, कमलाकर चौधरी, नाशिक ग्रामीण येथून अमोल पवार, शैलेश पाटील व मधुकर गांगुर्डे यांचा समावेश आहे.

दरम्यान, बदली झालेल्या संबंधीत पोलीस उपनिरीक्षक यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, जे पोलीस उपनिरीक्षक बदली ठिकाणी कार्यमुक्त करूनही वेळेत बदलीवर हजर होणार नाहीत त्यांच्याविरूध्द संबंधीत पोलीस अधीक्षक यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी बदली आदेशात नमूद केले आहे.

Leave a Comment