संगमनेर(DSNews24/ किरण पुरी) तालुक्यातील कौठेमलकापूर येथील कै. योगेशभाऊ डोंगरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पठार भाग चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर दक्षिणचे सह संपर्क प्रमुख पै. रावसाहेब खेवरे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे व नेते जनार्दन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले, देवा उद्योग समुहाचे संस्थापक सोमनाथ शेठ बारवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ २८ फेब्रुवारी रोजी झाला असून अंतिम सामना वार – रविवार ५ मार्च रोजी होणार आहे.
या स्पर्धेच प्रथम पारितोषिक ३१ हजार, द्वितीय पारितोषिक २१ हजार, तृतीय पारितोषिक १५ हजार व चतुर्थ पारितोषिक ११ हजार असणार आहे.
कै. योगेशभाऊ डोंगरे कौठेमलकापूर कट्टर शिवसैनिक होते. गतवर्षी त्यांचं अपघाती निधन झाले होते. त्यामुळे प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ देवा उद्योग समुहाचे संस्थापक सोमनाथ बारवे यांच्या संकल्पनेतून मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पठारभाग चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. त्यानंतर युवा सेना तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले व शाखा प्रमुख गणेश डोंगरे यांच्या नेतृत्त्वाखाली कौठेमलकापूरसह पठार भागातील शिवसैनिकांनी एकत्र येत भव्य नियोजन केले.
स्पर्धेचा चौथा दिवस संपला असून संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक, बोटा, साकूर, पानोडी, अकलापूर, हंगेवाडी, वरवंडी, कुंभारवाडी, चिंचपूर, जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी, खोडद, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, कान्हूर पठार, कर्जुले हर्या, तसेच श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील शेरी, दरडगाव थडी, लोणी, चिंचाळे, मांजरी, आदि ठिकाणाहून विविध संघांनी स्पर्धेत सहभागी घेतला. स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसांत अनेक चुरशीचे सामने बघायला मिळाले. तसेच विविध खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली. त्यामुळे प्रेक्षकांनाही आनंद घेता आला. दरम्यान, रविवारी ५ मार्च रोजी उपांत्य फेरी व अंतिम फेरीचा सामना होणार आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी गणेश डोंगरे(शिवसेना शाखाप्रमुख कौठे मलकापुर), श्रीपाद पवार, दत्तु पवार, लालु शेख, लालु पवार, कैलास डोंगरे, गणेश परचंडे, कैलास बरकडे, दिलीप जाधव, सुदाम बर्डे, पोपट जाधव, राजु बर्डे, प्रभाकर बर्डे, निवृत्ती पवार, राजु बागुल, जावेद मोमीन, अल्ताफ शेख, शकिल शेख, सचिन वनवे, आगन बर्डे, रहेमान शेख, मंगेश बर्डे, अविनाश बर्डे, किरण बर्डे, आकाश खैरे, दिलीप आमले, एकनाथ बरकडे, बुधा वारे, मच्छिंद्र पारधी, पोपट मेंगाळ, लक्ष्मण बागुल, खंडेराव बरकडे, गोरख पवार, रमेश बर्डे, अक्षय बागुल,साई परचंडे,राहुल बर्डे, अक्षय बर्डे, संदीप गंभीरे, नवनाथ गंभीरे, पोपट परचंडे, रामनाथ बर्डे, नवनाथ बागुल, बाबु ठिकेकर, विजय मोरे, संतोष बागुल, विशाल गावडे, अजय पवार, बाळासाहेब बरकडे, दौलत बर्डे, किशोर बर्डे, निलेश बर्डे आदिंसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
