महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरु असताना त्रिपुरा राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. त्रिपुरात एकूण 5 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय.
एकूण 5 आमदारांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय. यामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्रिपुरात शुक्रवारी 7 जुलै रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशेनाला सुरुवात झाली. या पहिल्याच दिवशी फुल्ल राडा झाला.
भारतीय जनता पार्टी आणि तिप्रा मोठा पार्टी आमदार एकमेकांना भिडले. रस्त्यावर ज्या प्रकारे राडा होतो, त्याचप्रमाणे हे दोन्ही पक्षांचे आमदार आपआपसात भिडले. आमदार विधानभवनात टेबलवर चढून घोषणाबाजी करु लागले.
फक्त एकमेकांची डोकी फोडायची बाकी राहिली होती. या सर्व प्रकरणानंतर एकूण 5 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
