दिवाळीत महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित?

मार्च २०२२ पासून प्रशासक असलेल्या सर्व महापालिका व जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींची निवडणूक पावसाळा संपताच म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर २०२३ मध्ये एकत्रित होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

एप्रिल २०२४ मध्ये लोकसभा तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी निवडणूक घेणे शक्य नाही.

या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीत होण्याची शक्यता असून त्यातून मतदारांचा कल सर्वच राजकीय पक्षांना समजणार आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा निर्णय होऊ शकतो.

Leave a Comment