जामखेड (Jamkhed) तालुक्यातील हाळगाव येथे एका महिलेसह तिच्या दोन बालकांचे मृतदेह एका शेततळ्यात तरंगताना आढळून आले आहेत. सदर महिला व मुले 10 जुलै पासुन बेपत्ता होते. ही आत्महत्या की घातापात याची परिसरात उलटसूलट चर्चा सुरू आहे.
चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे (वय 31) दिपाली बबन पाचारणे (वय 11) व राजवीर बबन पाचारणे (वय 8, रा. सर्व हळगाव, ता. जामखेड) अशी या घटनेतील मृतांंची नावे आहे.
पोलीसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार हाळगाव येथील पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला (Jamkhed Police Station) माहिती दिली की, हाळगाव येथील शेतकरी भीमराव माहदू पिंपळे (रा. हळगाव) यांच्या गट नंबर 434 मधील शेतातील शेततळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत. हे तीघेही हळगाव गावातील आहेत. मिळालेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
