मेष : जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. खासगी घडामोडी नियंत्रणाखाली राहतील. प्रवासामुळे नवीन व्यवसाय संधी मिळतील.
वृषभ : प्रवास आणि शैक्षणिक सहलीमुळे जागरुकतेत वाढ होईल.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, ते तुम्हाला आज कळेल.
मिथुन : पत्नी तुम्हाला आनंदी करील. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.
कर्क : तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः साथ देईल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल.
सिंह : आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता. हे धन तुमच्या बर्याच समस्यांना दूर करू शकते.
कन्या : कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. मनावर ताबा ठेवा.
तूळ : अध्यात्मिक गुरू अथवा वडीलधार्यांकडून मार्गदर्शन लाभेल. शेजारी वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील.
वृश्चिक : काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत, याची खात्री होत नाही, तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. विचार करून बोला.
धनु : तुमचे कुटुंब एखाद्या आनंदी, प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस.
मकर : संध्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी मन लावून काम करण्याची आवश्यकता. वैवाहिक आयुष्यातील आजचा एक उत्तम दिवस असेल.
कुंभ : ध्यानधारणा आराम मिळवून देईल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. मन प्रसन्न राहील.
मीन : मुलांकडून धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. त्यामुळे मुले त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात.
