महाराष्ट्रात पावसाचा कसा आहे अंदाज, वाचा….

पुढील आठ दिवसात कमी-अधिक फरकाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी १४ ते १६ जुलै दरम्यान कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

१४ ते २७ जुलै दरम्यान राज्यासह खान्देश भागात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस होईल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान बदलांमुळे राज्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात विविध ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Leave a Comment