मेष : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील.
मिथुन : काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. अनेकांशी सुसंवाद साधाल.
सिंह : सामाजिक क्षेत्रात तुमचा विशेष प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील.
कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
तूळ : व्यवसायातील उलाढाल वाढेल. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
धनू : कामात अडचणी जाणवतील. व्यवसायातील महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मकर : मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल. मुलामुलाींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.
कुंभ : सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल.
मीन : काहींना गुरुकृपा लाभेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.
