शेतीच्या वादातून दोन भावांमध्ये तुफान राडा ; तलवारीने वार करत गोळीबार, बाप – लेक ठार

नंदुरबारमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये झालेल्या तुफान राड्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शेतीच्या वादा दरम्यान गोळीबार करण्यात आला. त्याचसोबत तलवारीने वार देखील करण्यात आले होते. या घटनेमध्ये ४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहादा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे ही घडली आहे. शेतीच्या वाटणीवरुन दोन कुटुंबामध्ये वाद झाला. दोन चुलत भावांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान राडा झाला.

या राड्यादरम्यान गावठी कट्यातून दोन राऊंड फायरिंग करण्यात आले. तसंत तलवारीने देखील वार करण्यात आले. गोळी लागल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या राड्यामध्ये गोळी लागल्यामुळे बाप-लेकांचा मृत्यू झाला आहे. तर चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर नंदुरबारच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जखमींमध्ये आरोपीचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Leave a Comment