पारनेर आणि नगर मधील ‘या’ मंदिरात चोरी करणारा जेरबंद

नगर तालुक्यातील गोरक्षनाथ गड मंदीरातील तीन दानपेट्या फोडणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी वाकोडी (ता. नगर) येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

महेश सुर्यभान पवार (वय 25, रा. पदमपुरवाडी, वाकोडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चांदीचा मुकूट व रोख रक्कम असा 20 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान, त्याने साथीदार संजय गुलाब पवार, अनिकेत सोपान पवार (दोघे रा. पदमपुरवाडी, वाकोडी) व सोनु लहू बर्डे (रा. शिराढोण ता. नगर) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच महेश पवार याने किरण पवार याच्यासोबत एप्रिल 2023 मध्ये वाघुंडे खुर्द (ता. पारनेर) येथील दत्त मंदीरात चोरी केल्याची कबूली दिल्याने तो गुन्हा उघडकीस आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार दत्तात्रय हिंगडे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले, संतोष लोढे, फुरकान शेख, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, बापुसाहेब फोलाणे, उमाकांत गावडे व अरूण मोरे यांच्या विशेष पथकाने सदरची कामगिरी केली आहे.

Leave a Comment