लोकसभेसाठी मोर्चेबांधणी! नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची ‘या’ नेत्यावर जबाबदारी 

भाजपच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ‘इंडिया’ आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यात लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

निवडणूक तयारीचा भाग म्हणून काँग्रेसने राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघांत निरीक्षक आणि समन्वयक नेमले आहेत. हे निरीक्षक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतील.

याशिवाय मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि संघटनेची शक्ती याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत.

त्यात अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Leave a Comment