मुलासह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, नगरमधील घटना

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे 10 वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली.

मनीषा संदीप नरवडे (35) व ओमकार संदीप नरवडे (10, दोघे रा. गारूडकर वस्ती, तिसगाव, ता. पाथर्डी) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

तिसगावमध्ये मुलासह महिलेने आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गारुडकर वस्ती जवळील विहिरीजवळ धाव घेतली.

माय लेकराचा मृतदेह पाण्यात तरंगताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. नरवडे कुटुंबातील माय लेकरांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Comment