मोठी बातमी! काँग्रेसचा बडा नेता सभागृहातून निलंबित 

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना (दि.१०) लोकसभेत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन होण्यापूर्वी चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले होते.

लोकसभेत काँग्रेस नेत्याचे निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधीर रंजन चौधरी यांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले आहे.

समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Comment