मेष – वाहने जपून चालवावीत. गुरूकृपा लाभेल.
वृषभ – आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन – महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क – महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह – राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.
कन्या – एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
तुळ – महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक – आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनु – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.
मकर – संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कुंभ – तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन – जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
