संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील भाऊसाहेब सिताराम सागर यांच्या पत्नी कै. सौ. मिराबाई भाऊसाहेब सागर यांचं दुःखद निधन झालय.
वार – गुरूवार दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजून ३५ मि. वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीराबाई ह्या एक मनमिळावू मायाळू स्वभावाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती भाऊसाहेब सागर व गुलाब, सुनिल असे दोन मुले, सुना, नातवंडे व मुलगी शैला शिरोळे असा परिवार आहे. मीराबाई यांच्या निधनाने बिरेवाडीवर शोककळा पसरली आहे.
